फर्ग्युसन – मागे वळून बघताना.

दहावीची परीक्षा संपून चार महिने झाले होते. मामाच्या गावाला जाऊन कैर्या पडणे, विहिरीवर पोहायला जाणे, सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टर अश्या सगळ्या राईड पूर्ण झाल्या होत्या. सुट्टी संपल्यावर शेवटी पुण्याला येउन जुनिअर् कॉलेज चे फाॅम्स् वगरे भरून झाले होते.

आणि अखेर तो दिवस उजाडला, बायफोकल ची अडमिशन कन्फम करण्यासाठी मी आणी पप्पा फर्ग्युसन ला जाण्यासाठी निघालो आणि वरुणराजा बरसला. असा बरसला कि वेळ पाळण्यासाठी अखेर भिजत जावे लागले. दहावीच्या सत्कार समारंभात बक्षीस मिळालेला फोल्डर, ज्यात सगळे सर्टिफिकेटस् होते तो कसाबसा पाण्यापासून वाचवून मी मात्र ओला झालो होतो. त्या अवस्थेत फर्ग्युसन चे पहिले दर्शन झाले.गेट पासून पहिले प्रस्थान म्हणजे अॅम्फि थिएटर. बायफोकल ची अडमिशन नक्की करण्यासाठी स्टेज वर पोहचे पर्यंत आता मात्र हेच काॅलेज हवं हे मी पक्कं केलं होतं. फायनली शेवटून दुसरी जागा मिळाली आणि माझा जीव भांड्यात पडला.

महिन्याभराणि म्हणजेच २८ ऑगस्ट २०१० ला पहिला दिवस होतां. अॅकॅडमिक कॉम्पलेकस मध्ये गेल्यावर, एक दोन ओळखीचे चेहरे दिसले तेव्हा हायसं वाटल. मी आणि शाळेतले दोन मित्रं आपले कोपर्यात गप्पा मारत थांबलो होतो. न्यू इंग्लिश स्कूल ला फक्त मुलांच्या शाळेत असल्याने, इथे एवढ्या मुली पाहून जरा अवघड वाटत होतं. मुलांच्या मध्ये शिव्या देतानाची हिम्मत हि मुलींकडे बघायलाहि कमी पडत होती. अखेर लेक्त्चरची बेल वाजली आणि जीवात जीव आला.

इलेक्ट्रोनिक्स च्या लेक्त्चरला सरांनी जेव्हा विचारलं, कि कायं रे वैशालीमध्ये गेला होतात का ?, तेव्हा वैशालीतला वेटर विचारतो काॅलेजला गेला होतात का, असा मिश्किल शेरा एका पुणेकराने मारला.

फिजिक्स, केमिस्ट्री ची प्रक्टिकलस करत करत एक महिना उलटून गेला होता. लेक्त्चर मधील नोकिया ५२३३ आणि समसुंग काॅरबी ची चर्चासत्रं बंद झाली होती. रोजचा दिनक्रम करता करता अखेर डिसेंबर उजाडला. काॅलेज मध्ये इवेन्टचं वारं वाहू लागलं होतं. पहिल वर्ष असल्याने आम्हीही खूप एक्सायटेड होतो. टाय डे ला आयुष्यात पहिल्यांदा टाय घातला. दुसर्या दिवशी ट्रॅडिशनल डे ला स्पिकर वर सगळं काॅलेज नाचलं. व्हेनु दुसरा तिसरा नसून आपलं ‘किमया’ होतं.

यानंतर सुरु झाला तो परीक्षेचा सिझन, लायबररि मध्ये जाणं, बसमध्ये रिव्हीजन करनं हे सगळं चालू होतं, कारण रोज तर कधी अभ्यास केलाच नाह्वता. आता सारखी तेव्हा जुनिअर् काॅलेज मध्ये खूप कपल्स् नसायची त्यामुळे सगळ्यांचे मित्रं परिवार मोठे होते. नोटस घेण्याच्या बहाण्याने बर्याच जनांनी नाती जोडली, पण आमची मात्र पेन मागायची पण हिम्मत झाली नाही. पुढे बारावीत थोडा धेर्य आलं होतं पण संधी कधीच निघून गेली होती.

मग बारावी !

चातकाने जशी पाण्यासाठी परीक्षा करावी तशी आमचीही लढाई सुरु झाली. फर्ग्युसन मध्ये आजू बाजूला हुशार विद्यार्थ्यांची कमी न्हवती त्यामुळे स्पर्धा आणि माेटिवेशन अगदी पुरेपूर.

सकळी काॅलेज, दुपारी झाेपं आणि संध्याकाळी टिव्शनस् मध्ये उन्हाळा एकदम निवांत गेला, मग आला पावसाला. पावसाळ्यात फर्ग्युसन ला जाणार्य माणसाचा मला महाबळेश्वर ला जाणार्य माणसापेक्षा जास्त हेवा वाटतो. आआहा ! ती हिरवळ आणि ते वातावरण. थोड्या जरी सरी पडू लागल्या कि पब्लिक किमया मध्ये पळायच.

फिजिक्स च्या प्रक्टिकल मध्ये पावसामुळे ऐकू येत नसल्याने प्रक्टिकल बंद करावं लागलं होतं. पावसाळ्यानंतर पुन्हा डेज् आणि इवेन्टस, पण क्लासवाल्यानी आणि पालकांनी अति केल्यामुळे त्या मजेवर पाणी सोडावं लागलं. त्या दरम्यान अॅम्फि थिएटर मध्ये अविनाश धर्माधिकारी सरांच विवेकानंदांवर एक सेमिनार झालें होतं, अंगावर रोमांच सळसळत होतं पण काही दिवसात तेही विराळून गेल. बारावीत हनुमान टेकडी तेवढि आम्ही नक्की सर केली.

नंतर उन्हाळ्यात बारावीची परीक्षा हाच तेवढा फर्ग्युसनचा शेवटचा संपर्क. बाकीच्यांसारखे जिवलग मित्रं मैत्रिणी किवा कॉलेजमधील तुफान मजा असं माझं आयुष न्हव्ते पण आयुष्यभर पुरेल एवढं इन्स्पिरेशन फर्ग्युसनन मला दिलं. आजही फर्ग्युसन रोड ला गेल्यावर मी कॉलेज मध्ये चक्कर मारतो आणि त्या ४-५ वर्ष पूर्वीच्या आठवणी जाग्या होतात. त्या अप्रतिम वास्तू बद्धल विचार करताना टिळकांन् बद्धल चा आदर मात्र वाढतच राहतो.

Advertisements