पाउस- एक स्वप्न !

विचारांच्या गाडीला निद्रेने वेढा घातला होता. इतक्यात एक स्वप्नवत विचार हळूहळू वाहू लागला. पावसाची रिपरिप हळूहळू आवाज वाढवू लागली. मातीमधील अत्तर जणू पावसाने जिवंत केले होते. AC ला हि लाजवेल असा मंद वारा अंगामध्ये एक नवे चैतन्य भरू पाहत होता आणि इतक्यात जग आली. ४ * ३ च्या खिडकीतून येणारा आवाज, वारा व सुगंध हे सर्वे सत्य आहे याची प्रचीती देत होता.

तोपर्यंत विचारांची गाडी १० – १२ वर्ष मागे गेली होती. प्रायमरी स्कूल ची वेळ, १ -२ री मध्ये असताना पहिल्यांदा आम्हाला होडी बनवायला शिकवली होती. बर तोपर्यंत होडी कुणी चित्रातही पहिली न्हवती त्यामुळे खरी होडी हि अशी दिसते असा गोड गैरसमज आम्ही शेंबडी बाळगून होतो. नेमका शाळा सुरु होताना देवाने पावसाला डीझाइन केला होता त्यामुळे होडीच अप्प्लीकेशन लगेच करता आलं. पाण्याच्या स्पीड नुसार ते बिचारी कागदाची होडी अंतर कापून बुडून जात होती. रस्त्यात जाताना पाण्याची तळी जणू त्या होडीसाठीच बनली होती.

शाळेतून घरी जाताना चपला व बूट जर कोरडे घरी गेले तर तो रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा अपमान समजावा. विजेच्या आवाजाला घाबरून आईला बिलगने यासाठीच जणू विजेचा अविष्कार झाला होता असं आता वाटतं.

पावसाळ्यात, एक विटकरी रंगाच्या आळयांचा गट्टा मातीत बघायला मिळायचा. त्याला आम्ही पैसा असा म्हणायचो. हा पैसा मातीत पुरल्यावर त्याचे खरे पैसे होतात या विचाराने अनेक आळेयांना आम्ही मूठमाती दिली होती.

पुढे सेकण्डरी स्कूल मध्ये बसने शाळेला जायचो, गर्दीत बसमध्ये चढताना टपवारच पाणी कसं चुकवता येयील ह्याचं स्किल प्रत्येकजण आत्मसात करण्याच्या प्रयत्नात होता.ग्राउंड मध्ये भर पावसात व चिखलात फुटबाल कसा खेळता येएल हे सर्वांच्या मनात प्लानेड असायचं. मग त्या माचमध्ये हरू व जिंकू पावसात भिजण्याच्या समाधानाने सगळ्यांनाच जिंकल्यासारख वाटायचं. पांढरा शर्ट व खाकी पाय्न्त वरील चिखलाचे डाग हे जणू अभिमानाने छाती फुगवत असतं.
२००६- ०७ मध्ये पुराच्या पावसाने लकडी पूल पाण्याखाली गेला आणि आम्हाला एका आठवड्याची सुट्टी मिळाली होती, हे मला आठवत.

पुढे ११ – १२ वीत तोच पाउस एका वेगळ्या रुपात बरसू लागला होता. तारुण्याला प्रेमाने झालर घातली होती. झाडाचे कट्टे प्रेमाने फुलून गेले होते. फर्ग्युसन मध्ये मी तर नेहमी खिडकीतून बाहेर पडणार्या पावसाच्या अनुभवात रमत असे. पाउस पडल्यावर ते फर्ग्युसन एका वेगळ्याच उंचीवर जात असे. भिंतींचे ते काळेशार दगड जेव्हा पाण्याने भिजत तेव्हा ते सोन्याहूनही जास्त चमकत असत.
११ – १२ वीच्या वयातील पाउस म्हणजे आपण काहीही करू शकतो याची जाणीव करू देत असे.
पुढे इंजिनीरिंग ला आल्यावर खरी पावसाची मजा लुटली. लेक्चुर बंक करणे तसं सोपे असल्यामुळे अनेकदा राएड ला जाता आल. लावासा पासून अगदी ताम्हिणी घाटापर्यंत ची भटकंती झाली. अंगावरील कपडे चिब होएपर्यन्त पावसात भिजणे व नंतर थंड वार्यामुळे मरे पर्यंत कुडकुडत गाडी चालवण्याची मजा काही औरंच. यासर्वात जर गरम वडापाव खायला मिळाला तर माहोल झाला म्हणूनच समजा.
पाउस हा सगळ्यांसाठी एक स्पेचिअल अनुभव असतो, मग तो कितीही त्रासदायक वाटला तरीही. छत्री घेऊन शाळेत जाणार्या मुलांपासून, पॊत डोक्यावर घेऊन शेतात जाणार्या शेतकऱ्या पर्यंत सर्वांना पाउस हा तितकाच प्रिय.

पावसाला प्रेयसी बनवून अनेकांनी त्यावर कविता लिहिल्या. अनेकांनी पावसाचं स्वप्न भंगल म्हणून आत्महत्या हि केल्या. पावसाला science नि कंट्रोल करता येते या विचाराने अनेकांनी कृत्रिम पावसाचे फुटकळ प्रयत्नही केले.
या सगळ्यात पाउस आजही एक स्वप्न आहे, जे सर्वजण स्वप्नू इच्छितात व काहीजण भेदरलेल्या विचाराने ते उराशी घेऊन पहुडतात.

 

 

Advertisements